जमीन हडप प्रकरणी आणखी एकास अटक

0
29

गोवा पोलिसांच्या एसआयटीने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणी शापोरा-बार्देश येथील ओंकार पालयेकर याला काल अटक केली. तसेच, जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार महमद सुहैल ऊर्फ मायकल याला पुन्हा अटक केली. एसआयटीने कळंगुट येथील जमीन हडप प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एसआयटीकडील तपासाखालील प्रकरणाची संख्या आता ४५ पर्यंत पोहोचली आहे. बार्देशचे माजी मामलेदार राहुल देसाई यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.