राज्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने धर्मापूर-कुंकळ्ळी येथील जमीन हडप प्रकरणी अब्बास अली मकानदार (37, रा. धारवाड – कर्नाटक) याला काल अटक केली. सासष्टी मामलेदारांकडून दक्षिण गोव्यातील जमीन हडप प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली होती. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दक्षिण गोव्यातील कुडतरी, राय, दवर्ली, गिरदोली, कुंकळ्ळी, कोलवा, धर्मापूर, सां जुझे दी आरियल आदी भागातील जमीन हडप प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणी सतरा जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून एक चौदाच्या उताऱ्यात नावांचा समावेश करून जमीन हडप करण्यात आली आहे.