जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अटकेत

0
12

गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकाव प्रकरणातील फरार झालेला मुख्य संशयित मोहम्मद सुहेल ऊर्फ मायकल याला गुरुवारी मध्यरात्री अटक केली. संशयित मोहम्मद सुहेल याला जमीन बळकावल्याच्या आणखी एका प्रकरणात अटक केली आहे.

जमीन बळकाव प्रकरणाच्या तपासासाठी मोहम्मद याला ९ दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली होती; मात्र त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. एसआयटीने जमीन बळकाव प्रकरणात मोहम्मद सुहेल याला काही महिन्यांपूर्वी अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका केली होती; मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो गायब झाला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.