जमीन घोटाळा प्रकरणी दोघा संशयितांना अटक

0
5

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास विभागाने (एसआयटी) आसगावमधील सर्व्हे क्रमांक 237/7 आणि 206/13 या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. दिव्य कुमार खंडार (44, रा. मंगेशी) आणि योगेश मगर (41, रा. म्हार्दोळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

आसगाव गावातील सर्व्हे क्रमांक 237/7 आणि 206/13 या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून मालकी हक्क हस्तांतरित करण्यात आल्याची तक्रार फेलिक्स नोरोन्हा (रा. हणजूण) यांनी 2022 मध्ये म्हापसा पोलीस स्थानकात नोंदविली होती. जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीकडे हे प्रकरण सुपूर्द के होते.