गोवा पोलिसांच्या एसआयटीने हणजूण येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावल्या प्रकरणी मोहम्मद सुहैल ऊर्फ मायकल व इतरांच्याविरोधात आणखी एक गुन्हा काल दाखल केला. रोझा डिसोझा, इस्तेव डिसोझा, अनिल गोयल, ओमप्रकाश मदना व इतरांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहम्मद सुहैल याला यापूर्वी अनेक जमीन हडप प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.