जपानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का

0
13

जपानला गुरुवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी होती. दक्षिण जपानच्या मियाजाकी इथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपामुळे जपानवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. हे धक्के बसताच नागरिक जीवाच्या भीतीने घराबाहेर पळाले. हवामान विभागाने क्यूशूच्या दक्षिण किनारपट्टी व जवळपासच्या भागात तब्बल 1 मीटर उंच लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे. भूकंपामुळे त्सुनामीदेखील आली आहे, जी पश्चिम मियाझाकी प्रांतात पोहोचली आहे. जपान सरकारने भूकंपाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष टास्क फोर्स तयार केले आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, भुकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.