जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिला आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये (एलडीपी) फूट पडू नये म्हणून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी जपानच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी मोदी यांनी, जपानचे पंतप्रधान इशिबा यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांनी भारत आणि जपानमधील विविध करारांवर सही केली होती. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत एलडीपीचा दारुण पराभव झाला होता.