जपानने त्याच्यापेक्षा रँकिंगने वरचढ असलेल्या कोलंबियाला (१६वे स्थान) पराभूत करीत धक्कादायक तथा ऐतिहासिक विजयाची नोंद केली. जपान सध्या जागितक ६१व्या स्थानावर आहे. त्याबरोबर जपान हा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या अमेरिकन देशाला पराभूत करणारा आशिया खंडातील पहिला संघ ठरला आहे. सामन्याच्या प्रारंभीच कोलंबियन संघाला १० खेळाडूंनिशी खेळावे लागल्याने ते सुरुवातीलाच बॅकफूटवर गेले होते.
सामन्याच्या प्रारंभीच मिळालेल्या पेनल्टीमुळे जपानने आघाडी घेण्यात यश मिळविले. ६व्या मिनिटाला त्यांनी ही आघाडी घेतली. कोलंबियाचा मध्यपटू कार्लोस सांचेजने जपानच्या शिंजी कगावाचा फटका हेतुपुरस्सर हाताने रोखला. त्यामुळे तिसर्याचा मिनिटाला त्याला रेफ्रीने रेड कार्ड दाखवून मैदानावर पाठवित जपानला पेनल्टी बहाल केली. त्यावर कोणतीही चूक न करताना शिंजी कागवागने गोल नोंदवित जपानचे खाते खोलले (१-०). सांचेजला मैदान सोडावे लागल्याने सामन्याच्या प्रारंभीच ३र्या मिनिटापासूनच कोलंबियाला १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. सांचेज हा यंदाच्या विश्वचषकातील रेड कार्ड घेणारा पहिला खेळाडूही ठरला.
एका गोलाच्या पिछाडीनंतर कोलंबियाने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्याचा फायदा त्यांना झाला आणि ३९व्या मिनिटाला जुआन फर्नांडो क्विंटेरोने कोलंबियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. पहिल्या सत्रात दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत राहिले होते.
दुसर्या सत्रात जपानने कोलंबियाच्या तोडीस तोड खेळ केला. त्यांच्या बचावपटूंनी कोलंबियाची आक्रमणे पतरवून लावली. ७३व्या मिनिटाला जपानला संधी मिळाली आणि त्याचा फायदा उठवित युगा ओसाकोने जपानच्या २-१ अशा ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.
जपानचा पुढील सामना आता २४ जून रोजी सेनेगलशी होणार आहे. तर त्याच दिवशी कोलंबियाची लढत पोलंडशी होईल.