जखमी तरुणाचे उपचारादरम्यान निधन

0
5

येथील मेरशी जंक्शनवर कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना काल निधन झाले. हा अपघात 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास घडला होता. मेरशी जंक्शनवर रस्ता ओलांडणाऱ्या विनोद नामक पादचाऱ्याला कारने धडक दिली. त्यात तो जखमी झाला होता. जुने गोवे पोलिसांनी कारचालक अविनाश कांता रेडकर (40, रा. वास्को) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.