कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक छोटा शकीलच्या मेहुण्याला काल ईडीने ताब्यात घेतले. ईडीच्या अधिकार्यांनी सलीम फ्रूट याला दक्षिण मुंबईतील कार्यालयात नेऊन त्याची चौकशी केली. सलीमकडे मनी लॉंड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. तत्पूर्वी, ईडीने मुंबईत मंगळवारी पहाटेपासूनच ठिकठिकाणी छापे मारले. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या घरी आणि अन्य संबंधित ठिकाणांवर झाडाझडती घेतली. तसेच मुंबईतील दहा ठिकाणांवर ईडीच्या पथकांनी छापे मारले. ईडी आणि एनआयएने संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली.