- शैलेंद्र देवळणकर
…त्यामुळेच मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर राङ्गेल या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा समावेश भारतीय वायुदलात करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती दिली. अखेर दसर्याच्या मुहुर्तावर आणि वायुसेना दिनाच्या दिवशी पहिले राङ्गेल विमान भारतात दाखल झाले आहे. या विमानाची मारकक्षमता आणि त्याची अन्य काही वैशिष्टे लक्षात घेतल्यास राङ्गेलमुळे पाकिस्तान आणि चीनच्या उरात का धडकी भरली आहे हे लक्षात येईल.
भारतीय हवाई दलाला दीर्घकाळापासून ज्याची प्रतीक्षा होती, अशा मल्टिरोल ङ्गायटर जेट राङ्गेलचे पहिले विमान भारताला हस्तांतरीत केले गेले. यासाठी एक अत्यंत भव्यदिव्य सोहळा ङ्ग्रान्समध्ये आयोजित केला गेला होता. त्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री स्वतः ङ्ग्रान्सला गेले होते. हे विमान भारताला सुपूर्द केले गेले तो दिवस ङ्गार महत्त्वाचा आहे. या दिवशी भारतीय वायूसेना दिन होताच, पण त्याचबरोबर विजयादशमी अर्थात दसर्याचा सणही देशभरात साजरा केला जात होता. हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.
राङ्गेलसारख्या मल्टिरोल ङ्गायटर जेटची भारतीय हवाई दलाला अत्यंत गरज होती. भारताला अशी एकूण ३६ राङ्गेल विमाने मिळणार आहेत. त्यातील पहिले जेट विमान मिळाले आहे, उर्वरीत विमाने २०२२ पर्यंत वायुसेनेत दाखल होणार आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढणार आहे. आजघडीला पाकिस्तानकडे एङ्ग-१६ सारखे लढाऊ विमान आहे, तर चीनकडे जे-२० सारखे अत्याधुनिक विमान आहे. या सर्वांची तुलना केली तर एक पाकिस्तानचे एङ्ग-१६ हे विमान दोन सुखोई विमानांच्या बरोबरीचे आहे; पण एक राङ्गेल विमान दोन एङ्ग-१६च्या बरोबरीचे आहे. राङ्गेल विमानाची लांबी १५.३० मीटर तर त्याचवेळी एङ्ग-१६ ची लांबी १५.०६ मीटर आहे. राङ्गेलचा आकार एङ्ग-१६ पेक्षा मोठा आहे. राङ्गेलचे एकून वजन दहा टन आहे आणि २४.५ टन वजनाचे शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. त्याचेवेळी पाकिस्तानच्या एङ्ग-१६ चे वजन केवळ ९.२ टन असून २१.७ टन शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. यावरुन राङ्गेल किती मोठे आणि महत्त्वपूर्ण आहे याची कल्पना आपल्याला येते. किंबहुना, भारतीय हवाई दलात राङ्गेल विमाने दाखल झाल्यामुळे वाढलेल्या सामर्थ्याची पाकिस्तान आणि चीनला धडकी भरली असल्यास नवल नाही. कदाचित म्हणूनच, आजवर चीन आणि पाकिस्तान हे भारताकडे राङ्गेल विमान येऊच नये अशा पद्धतीचे राजकारण त्यांच्या पातळीवर करत होते. त्यासाठी अनेक दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्या डावपेचांवर मात करत राङ्गेल विमाने मिळवण्यात भारत यशस्वी ठरला आहे.
भारतीय वायुदलात असणारी मिग विमाने आपण १९७०च्या दशकात रशियाकडून घेतली होती; तर सुखोई विमाने ही ८०च्या दशकात घेण्यात आली होती. त्यानंतर भारताकडे अशा स्वरूपाचे अत्याधुनिक विमान हवाई दलाच्या ताफ्यात आले नव्हते. गेल्या ३-४० ववर्षांपासून भारतीय हवाई दलाला अशा अत्याधुनिक विमानाची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली असून वायुदलाची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने युद्धाचे स्वरूप बदलले आहे, ते स्वरूप पाहता त्यावेळी हवाई दल हे सक्षम असणे गरजेचे आहे. बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केल्यानंतरही पाकिस्तानने आपल्या देशात घुसखोरी – छुपा हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला, तो हवाई मार्गेच केला होता, हे विसरुन चालणार नाही.
हवाई क्षमता भक्कम असणे का गरजेचे आहे हे दर्शवण्यासाठी अलीकडच्या काळातील दोन युद्धे ङ्गार महत्त्वाची आहे. यातील पहिले युद्ध म्हणजे १९६७ मध्ये झालेला अरब – इस्राईल संघर्ष. त्यात इस्राईलने पहिल्यांदा अरब देशांची विमाने नेस्तनाबूत केली. परिणामी, या संघर्षात इस्राईलची सरशी झाली. दुसरे युद्ध म्हणजे भारत- बांंग्लादेश संघर्ष. त्यावेळी पाकिस्तानकडे २० आधुनिक विमाने होती. पण ही २०ही विमाने नेस्तनाबूत करण्यात भारताला यश आले होते. ती भारतावरून उडूही शकली नाहीत. त्यामुळे १९७१च्या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांग्लादेशची निर्मिती झाली. या दोन्ही युद्धाचा गोषवारा घेता, असे लक्षात येते की सर्वप्रथम हवाई क्षेत्र नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे येत्या काळात जो काही संघर्ष होऊ शकतो तो हवाई मार्गेच होऊ शकतो.
संपूर्ण दक्षिण आशिया उपखंडाचे सामरिक समीकरण पाहिले तर आजघडीला चीन हा आपल्याला वरचढ ठरत आहे; तर पाकिस्तानला अमेरिकेकडून एङ्ग -१६ विमाने मिळाल्यामुळे त्यांचीही बाजू वरचढ ठरत आहे. या दोन्ही शेजारी स्पर्धक देशांच्या आव्हानाला शह देण्यासाठी भारतीय वायूदलाचे सक्षमीकरण गरजेचे असताना भारतात मात्र मिग विमानांचे अपघात होताहेत आणि त्यात मोठी जीवितहानी होते आहे. राङ्गेल हे विमान अमेरिकेच्या एङ्ग-१६ पेक्षा, रशियाच्या सुखोई आणि चीनच्या जी-२० या विमानांपेक्षा प्रगत आहे.
या विमानावर स्काल्प नावाचे क्षेपणास्त्र बसवलेले आहे. त्याची मारक कक्षा ३०० किलोमीटर आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने जो एअरस्ट्राईक केला होता ते बालाकोट हे ठिकाण भारतीय सीमेपासून ३०-४० किलोमीटर आत पाकिस्तानात आहे. त्यावेळी आपल्याला आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानात जाऊन हल्ला करावा लागला होता; पण आता राङ्गेलच्या आगमनामुळे आपल्याला सीमा ओलांडण्याची गरजच नाही. आपल्याच सीमेतून आपण ३०-४० नव्हे तर तब्बल ३०० किलोमीटर दूर अंतरावर हल्ला करू शकतो. हे लक्षात आल्यामुळेच आता
पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांचे धाबे दणाणले आहेत. राङ्गेलमध्ये मारा करण्यासाठी सज्ज असणारे कैल हे क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करते. म्हणजेच बालाकोटपेक्षाही लांब आतमध्ये जरी दहशतावादी प्रशिक्षण शिबिर असेल तर तेही आपण भारतात राहून नेस्तनाबूत करु शकतो. अशा प्रकारची क्षमता आजघडीला एकट्या भारताकडे आहे. राङ्गेलचे आणखी एक मोठे वैशिष्ट म्हणजे, येणार्या भविष्यात दुर्दैवाने भारत – पाकिस्तान संघर्षाने अणुयुद्धाचे स्वरूप घेतले तर राङ्गेलवर आपल्याला अण्वस्त्रे बसवता येतात. हा याचा अत्यंत महत्त्वाचा ङ्गायदा आहे. त्याचप्रमाणे हवेतच शत्रु राष्ट्राचे विमान नष्ट करण्याचीही क्षमता राङ्गेल मध्ये आहे. राङ्गेल विमानाचे इंजिन हे प्रगत म्हणजे ४.५ जनरेशन प्रकारचे आहे. या विमानाचा वेग अत्यंत जास्त आहे. एका तासात २२०० किलोमीटर वेगाने ते झेपावू शकते. तसेच हे विमान एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडू शकते. त्यामुळे पुर्वोत्तर राज्यांची, त्याचप्रमाणे चीन जवळची, पाकिस्तानजवळची सीमारेषा आणि समुद्रसीमारेषा या सर्वांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड राङ्गेलच्या आगमनाने घडली आहे.
राङ्गेल दाखल झाल्यामुळे भारताच्या दहशतवादाविरूद्धच्या संघर्षाला नवा आयाम मिळणार आहे. भारताची संरक्षणसिद्धता आणि प्रतिरोधन क्षमता खूप जास्त वाढणार आहे. परिणामी, देशावर भ्याड हल्ला करण्याचे दुःसाहस आपले शत्रू चुकूनही करणार नाहीत. त्यामुळे आजघडीला दक्षिण आशियात हवाईसज्जतेच्या दृष्टीकोनातून भारत हा आता निश्चितपणे चीन आणि पाकिस्तान दोघांच्याही तुलनेत वरच्या टप्प्यावर आहे, असे म्हणता येईल. एकूणच, राङ्गेलचे आगमन भारत संरक्षणाबाबत स्वयंपूर्ण असल्याची प्रतिमा ाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करण्यास मदतच करेल; शिवाय मित्राचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रांनाही थोडी जरब बसवण्यास उपयोगी ठरेल.