छत्तीसगडमध्ये 210 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0
2

सर्वात मोठे आत्मसमर्पण, 153 विविध शस्रे जप्त

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर आता काल शुक्रवारी छत्तीसगडमध्ये तब्बल 210 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी नक्षलवाद्यांनी आपल्याकडील 153 शस्त्रेही सुरक्षादलांकडे सुपूर्द केली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेत कालचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे सामूहिक आत्मसमर्पण ठरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांच्या उच्चाटनासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीपूर्वीच इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हत्यारे टाकून, आत्मसमर्पण करत आहेत.

आत्मसमर्पण आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी नेत्यांमध्ये 110 महिला आणि 98 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ते भाकपा (माओवादी) संघटनेच्या विविध पातळ्यांवर कार्यरत होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये रुपेश ऊर्फ सतीश, भास्कर ऊर्फ राजमन मंडावी, रनिता, राजू सलाम, धन्नू वेट्टी उर्फ संटू आणि रतन एलम अशा नेत्यांचा समावेश आहे.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू सहाय यांनी आजचा दिवस फक्त बस्तरसाठी नाही, तर संपूर्ण छत्तीसगड आणि देशासाठी ऐतिहासिक आहे. जे युवा वर्षानुवर्षं माओवादी विचारसरणीच्या अंधारात अडकले होते, त्यांनी आज संविधानावर आणि विकासाच्या नीतिवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी बंदूक खाली ठेवून संविधान उचलले आहे. हे दृश्य सर्वात भावनिक, छत्तीसगडच्या उज्जवल भवितव्याचे असल्याचे सांगितले.

सर्वात माठे आत्मसमर्पण

बस्तरचे महानिरीक्षक सुंदरराज पट्टिलिंगम यांनी यावेळी, माओवादी कार्यकर्त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल अशी माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी या नक्षलवाद्यांनी, एकूण 153 शस्त्रे जमा केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात एकाचवेळी आत्मसमर्पण यापूर्वी कधी झाले नव्हते. तसेच यानंतर इतर अनेक नक्षलवादीही आत्मसमर्पण करतील असा विश्वास व्यक्त केला.