छत्तीसगडमधील चकमकीत महिलेसह 10 नक्षलवादी ठार

0
17

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह 10 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक लाइट मशीनगन, एक 303 रायफल, एक 12 बोअरची बंदूक, मोठ्या प्रमाणात बॅरल ग्रेनेड लाँचर, गोळे, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटली नाही.
मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. येथे सुरक्षा दलाच्या जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानावर होते. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आणि नंतर शोधकार्यात चकमकीच्या ठिकाणी आणखी सहा मृतदेह आढळले. नक्षलवादी दरवर्षी मार्च ते जून या काळात टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह मोहिमा राबवतात व आपल्या कारवाया तीव्र करतात. यापूर्वी 27 मार्च रोजी विजापूरच्या बासागुडा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले होते.