छत्तीसगडमध्ये घडलेल्या एका मोठ्या दुर्घटनेत खाण खचल्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला असून खाणीत ५ जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना जगदलपूर येथून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगावमधील खाणीत घडली आहे. ही खाण खचल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी खाणीतून सातजणांना बाहेर काढण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
ही दुर्घटना घडल्याचे कळताच तातडीने पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरु करत खाणीत अडकलेल्या ७ जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. आणखी किमान पाचजण खाणीत अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.