चोवीस तासांत राज्यात 108 नवे कोरोना रुग्ण

0
10

राज्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या प्रमाणात काल पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली. काल रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा शंभरी गाठली असून गेल्या चोवीस तासांत नवीन 108 रुग्ण सापडले. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्या आता 776 एवढी झालू आहे. काल एकाला इस्पितळात दाखल केले. काल चोवीस तासांत 119 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले. चोवीस तासांत 710 एवढ्या जणांची तपासणी करण्यात आली. .