राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असल्याचे निदर्शनास येत आहे. काल रविवारी राज्यात कोरोनाचे ३५ रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यातील बळींची संख्या ३४८२ एवढी असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ४११ झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत ६० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के एवढे आहे. काल रविवारी कोरोनाची लक्षणे जाणवल्याने तीन रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
तसेच कोरोनामुक्त झाल्यामुळे एकाला इस्पितळातून घरी पाठवण्यात आले. काल कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ३२ जणांनी घरी विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. काल मंगळवारी राज्यात कोरोनासाठी २११९ जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली. राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून तिथे आता रुग्णसंख्या५५ झाली आहे. तर नावेली ४२ आणि पणजीत सध्या ४४ रुग्ण आहेत.