चोवीस तासांत नवे 75 कोरोनाबाधित

0
6

राज्यात चोवीस तासांत नवीन 75 कोरोना बाधित आढळून आले असून 9 बाधिताना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यात नवीन बाधित आढळून येण्याचे प्रमाण 10.9 टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या 442 एवढी आहे. चोवीस तासांत आणखी 687 स्वॅबची चाचणी करण्यात आली आहे. चोवीस तासांत एका बाधिताला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असून 79 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात मागील चौदा दिवसांत शंभरपेक्षा कमी नवीन बाधित आढळून येत आहेत. राज्यात या महिन्याच्या सुरुवातीला दररोज शंभरपेक्षा जास्त बाधित आढळून येत होते.