गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10 हजार 112 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 9 हजार 833 लोक बरे झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 67 हजार 806 आहे. एप्रिलच्या 22 दिवसांत 1.69 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. मार्चच्या 31 दिवसांत केवळ 31,902 प्रकरणे नोंदवली गेली. त्या तुलनेत एप्रिलमध्ये 5.3 पट अधिक रुग्ण आढळून आली आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला रोज दोन-तीन हजार रुग्ण आढळून येत होते. हा आकडा दररोज एक हजाराने वाढला असून 12 एप्रिल रोजी 10,158 प्रकरणे आढळून आली. 13 एप्रिल रोजी 11,109, तसेच 14 एप्रिल 10,753 व 15 एप्रिल रोजी 10,093 रुग्ण आढळून आली. 20 एप्रिल रोजी 11,692 आणि 21 एप्रिल रोजी 12,193 प्रकरणे नोंदवली गेली.