राज्यात सप्टेंबर महिन्यातील पहिल्या कोरोना बळीची काल नोंद झाली असून राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९६४ एवढी झाली आहे. चोवीस तासांत स्वॅबच्या चाचणीमध्ये घट झाली असून नवीन ५२ बाधित आढळून आले असून ५ बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात चोवीस तासांत ४६७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ५७० एवढी झाली आहे. चोवीस तासात आणखी ७२ बाधित बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२३ टक्के एवढे आहे.