म्हादई अभयारण्याच्या कक्षेत येणार्या गोवा बेळगाव रस्त्यावरील चोर्ला घाटात गेला महिनाभर पट्टेरी वाघाचे अधून मधून दर्शन घडत असतानाच गुरुवारी रात्री बोलेरो जीपच्या समोरून पट्टेरी वाघाने उडी मारल्याने जीपमधील इसमाची भीतीने गाळण उडाली.चंद्रकांत भोजे पाटील हे चोर्ला भागातून गोव्याच्या दिशेने येत असताना चोर्ला हिवरे रस्ता परिसरात त्यांच्या जीपसमोर पट्टेरी वाघाने उडी घेतली. गाडी थांबताच वाघ शांतपणे रस्त्याच्या बाजूला जाऊन एका ठिकाणी बसला.