चोरट्यांकडून ३५ लाखांचे टायर हस्तगत

0
134

दि. १९ नोव्हेंबर रोजी एम. आर. एफ. कंपनीकडून जवळ जवळ ३५ लाख किंमतचे टायर घेऊन गेलेला ट्रक नियोजित स्थळी न पोचल्याची तक्रार फोंडा पोलिसात नोंदवल्यानंतर फोंडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. ए. मळीक यांनी तपासकाम करून आतापर्यंत ट्रक चालक आझाद अहमद शेख (मूळ राहणार उत्तर प्रदेश) व टायर घेऊन परस्पर विक्री करणारे शामसुंदर चव्हाण (२८) व देवांग ढोलकीया (२६) शिवर- गुजरात यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २८ लाखांचा माल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. उपनिरीक्षक रामचंद्र नाईक व हवालदार जितेंद्र गावडे यांनी तपासकामात सहाय्य केले. २३० टायर घेऊन ट्रक गेला होता. गुजरातला माल आरोपींना दिला. त्यानी टायरची परस्पर विक्री केली. रिकामा ट्रक करजल-गुजरात येथे सापडला. चालक मुंबईला पळाला होता. प्रथम ट्रक ताब्यात घेतला व नंतर चालकाला भुसावळ, मुंबई येथे अटक केली.