चोडणमध्ये 96 लाख खर्चून फ्लोटिंग जेटी

0
17

चोडण येथे अंदाजे 96 लाख रुपये खर्चून फ्लोटिंग जेटी उभारण्यात येणार आहे. चोडण येथील फेरी धक्क्यावर बंदर कप्तान विभागाने फ्लोटिंग जेटी उभारण्यासाठी निविदा मागवली आहे. अंदाजे 96.65 लाख रुपये खर्चून तरंगती जेटी उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. किनाऱ्याच्या भिंतीपासून फ्लोटिंग जेटीवर उतरण्यासाठी पुरेशा मरीन ग्रेड ॲल्युमिनियम (गँगवे) सह चोडण फेरी रॅम्पवर आरसीसी एन्कॅप्स्युलेटेड पॉलिस्टीरिन कोर पाँटूनच्या फ्लोटिंग जेटीचे डिझाईन बांधकाम, पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वित करण्यासाठी निविदा मागवली आहे.