राज्य सरकारने आयएएस अधिकारी चोखाराम गर्ग यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती काल केली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य निवडणूक आयुक्त श्रीवास्तव यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून नवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून चोखा राम गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्ग हे कायदा, कला व संस्कृती खात्याचे सचिव म्हणून काम पाहत आहे. राज्यातील दोन जिल्हा पंचायत आणि अकरा नगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक लवकर घेण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाल सुरू आहे.