चेंबुर मुंबई येथे आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

0
4

चेंबूर-मुंबई येथील सिद्धार्थ कॉलनीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काहीजण जखमीही झाले आहेत. त्यांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. पहाटे 4:30 ते 5:00 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात यश आहे. शनिवारी रात्री सर्वजण झोपेत असताना एक दुर्घटना घडली. पहाटे साडे चार वाजता या कॉलनीला आग लागली. झोपेत असल्याने अनेकांना काय घडले हे कळले नाही. या कॉलनीत राहाणाऱ्या एकाच कुटुंबातील सातजणांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.