चीनी राष्ट्राध्यक्षांचे नाव चुकवणार्‍या अँकरला हटवले

0
94

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पहिल्या नावातील एक्स आय ही अक्षरे रोमन अकरा समजून ‘इलेव्हन जिनपिंग’ असे नाव उच्चारणार्‍या दूरदर्शनच्या हंगामी वृत्तनिवेदकाला काल कामावरून कमी करण्यात आले. दि. १६ रोजीच्या बुलेटीनमध्ये ही चूक झाली होती. बातम्यांच्या सादरीकरणाचा आढावा घेणार्‍या समितीने काल सकाळी या निवेदकाला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.