नैऋत्य चीनच्या यून्नान प्रांतात काल झालेल्या भूकंपात सुमारे १७५ जण ठार मृत्युमुखी पडल्याचे तर सुमारे १४०० जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त होते. भूकंप ६.५ मॅग्नीट्यूड तीव्रतेचा होता.
तेथील स्थानिक वेळेनुसार काल संध्याकाळी ४.३० वा. झालेल्या या भूकंपात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सुमारे १२ हजार घरे कोसळून पडली असून सुमारे ३० हजार घरांची अन्यप्रकारे हानी झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. अनेक जण बेपत्ता झाले आहेत. प्रांतात वीज, वाहतूक व दूरध्वनी यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडल्याचेही सांगण्यात आले.