चीनचे राष्ट्राध्यक्ष आज अहमदाबादेत

0
95

मोठ्या करारांची अपेक्षा
चिनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आजपासून तीन दिवसांच्या गुजरात भेटीसाठी अहमदाबादेत दाखल होतील. व्यापार उद्योगात वाढ करणे तसेच गुंतवणूक करण्याविषयी ते चर्चा करतील. दोन्ही देशांतील सीमावादाविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. चिन भारतात रेल्वे, उत्पादन, साधनसुविधाया क्षेत्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी चिनी राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी काल अहमदाबादेत दाखल झाले.
मोदी म्हणाले की, उभय राष्ट्रांत सर्व क्षेत्रांत संबंध सुधारावेत अशी भारताची इच्छा आहे. मात्र त्यासाठी दोन्ही देशांतील वादाच्या मुद्द्यांवरही तोडगा निघायला हवा. तो निघाला तर परस्पर सहकार्याचे वातावरण अधिक सुदृढ बनू शकेल. शी हे उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत येत असून त्यात दोन वरिष्ठ पॉलीटब्यूरो सदस्य तसेच चिनी वाणिज्य मंत्र्यांचा समावेश आहे. आज पंतप्रधानांचा ६४ वा वाढदिवस असून त्यानिमित्त साबरमती नदीकिनारी खास जेवणाचा कार्यक्रम मोदींनी चिनी राष्ट्राध्यक्षांसाठी आयोजित केला आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष गांधींच्या साबरमती आश्रमालाही भेट देणार आहेत.
स्वतंत्र भारतात ही तिसर्‍या चिनी राष्ट्राध्यक्षांची भारतभेट आहे.