कोरोनाविरोधात लढण्यासाठी चीनने भारताला वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा सुरू केला असून गुरुवारी चीनने भारतासाठी ६ लाख ५० हजार मेडिकल किट्स पाठवले आहेत. त्याशिवाय कोरोनाची चाचणी करण्यासाठीचे किट्स आगामी १५ दिवसांत भारतात दाखल होणार आहे.
चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली. रॅपिड ऍण्टी बॉडी टेस्ट्स आणि आरएनए एक्सट्रॅक्शन किट्ससह एकूण साडे सहा लाख किट्स ग्वांग्झू विमानतळावरून भारतासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना संसर्गाशी जवळपास अडीच महिने सामना केल्यानंतर चीनमध्ये उद्योग, कारखाने सुरू झाले आहेत.
भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित भागांमध्ये लवकर वैद्यकीय तपासणी व्हावी यासाठी कोरोना चाचणीच्या किट्सचे मोठ्या प्रमाणावर पाठवले आहेत.