चिनने घुसखोरी केल्याचा लष्कर प्रमुखांकडून इन्कार

0
187

चिनी लष्करानेे भारतीय भूभागात घुसखोरी केल्याच्या वृत्ताचा भारतीय लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी इन्कार केला आहे. ‘तसे काही घडले नाही’ असे घुसखोरी झाली होती का, या प्रश्‍नावर ते म्हणाले. एका वृत्तानुसार मंगळवारी लडाखमधील बुरत्से भागात चिनी सैन्य भारतीय हद्दीत सुमारे २५ ते ३० किलोमीटरपर्यंत आले. तेथे त्यांनी छावण्या उभारल्या व झेंडे फडकवले. या झेंड्यांवर ‘हा चिनचा भाग आहे, परत जा’ असे लिहिले होते. या वृत्तात असेही म्हटले होते की, चिनी सैन्या दिवसभर तेथे होते. लडाखचा हा भाग समुद्र सपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर आहे.