चित्रपटनगरीसाठी राज्य सरकारचे प्रयत्न

0
3

राज्य सरकारच्या गोवा मनोरंजन संस्थेने राज्यात चित्रपटनगरी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. सुमारे 250 एकर जमिनीत चित्रपटनगरी उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, ज्यांच्याकडे स्वत:ची 250 एकर जमीन असलेल्या जमीनदारांनी कागदपत्रांसह दहा दिवसांत संपर्क साधण्याचे आवाहन एका जाहिरातीद्वारे केले आहे. गोव्यात चित्रपटनगरी सुरू करण्यासाठी मागणी केली जात असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात चित्रपटनगरी सुरू करण्याबाबत घोषणा यापूर्वी केलेली आहे. गोव्यात आत्तापर्यंत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे; मात्र राज्यात खास चित्रपट नगरी नाही. चित्रपटनगरीसाठी जागेची नितांत गरज आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास चित्रपटनगरीचे स्वप्न साकार होऊ शकते.