उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी इंदिरानगर चिंबल येथील काही भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
इंदिरानगर या झोपडपट्टी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० झालेली असून सुमारे ६१ घरांचा मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये समावेश केला आहे. तर सभोवतालच्या घरांचा बफर झोनमध्ये समावेश केला आहे.