चिंचणी व्हेटरन्स क्लबने वास्को व्हेटरन्स क्लबचा टायब्रेकरवर ५-४ अशा गोलफरकाने पराभऐ करीत कामोर्ली-अंबोरा मैदानावर खेळविण्यात आलेल्या राशोल व्हेटरन्स फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूर्ण वेळेत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. टायब्रेकरवर चिंचणी व्हेटरन्सतर्फे जेरी फर्नांडिस, उर्बान फर्नांडिस, प्रेसली परेरा, जॉस्ली परेरा आणि मार्सेलिनो पिंटो यांनी गोल नोंदविले. तर पराभूत वास्को व्हेटरन्सच्या विशांत पेडणेकर, उदय नाईक, नेल्सन आणि शेख अबू यांनाच जाळीचा वेध घेता आला.