जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन आणि एका स्थानिक दहशतवाद्याला काल ठार करण्यात यश आले. शोपियान जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय लष्कराला हे यश मिळाले. सुरक्षा दलाच्या जवानांनी द्राच परिसरात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर मुलू येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. पोलिसांनी ट्विट करत या कारवाईस दुजोरा दिला आहे. ठार करण्यात आलेले दोन दहशतवादी एसपीओ जावेद दार यांच्या हत्येत सहभागी होते. २ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी जावेद दार यांची हत्या केली होती.