चाचणीसाठी धारगळच्या रेडकर इस्पितळाची निवड

0
144

भारत बायोटेक आणि इंडियन कॉन्सील ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त सहकार्याने तयार केलेल्या कोविड १९ लसीच्या चाचणीसाठी ओशेलबाग धारगळ येथील रेडकर इस्पितळाची निवड करण्यात आली आहे.

इस्पितळाचे डॉ. सागर रेडकर यांनी याबाबत सांगितले की, सर्व सोपस्कार कागदोपत्री झाल्यानंतर लस इस्पितळात उपलब्ध होणार आहे. हे इस्पितळ कोविड रुग्णांसाठी नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांनुसारच निवडक इच्छुक स्वंयसेवकांना लस दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या निवडीबद्दल पेडणे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.