चांद्र मोहिमांचे महत्त्व सर्वसामान्यांना कळावे, यासाठी राज्य सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने चांद्र मोहिमेला समर्पित काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन पुढील काही दिवसांत केले आहे. फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमीच्या सहकार्याने हे कार्यक्रम होणार आहेत.
15 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता जुन्ता हाऊस पणजी आणि मडगाव येथील खगोलशास्त्र वेधशाळेत इस्रो व चांद्र मोहिमेवर आधारित चित्रपट आणि संवादात्मक सादरीकरण होईल.
18 जुलै रोजी व 19 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता चांदद्रयान आणि चंद्र विज्ञानावरील ऑनलाइन कार्यक्रम होतील.
20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्र आणि खोर्ली-म्हापसा येथील श्रीदोरा काकुलो महाविद्यालयात सायंकाळी 7 वाजता ‘टू द मून अँड बॅक’ हा कार्यक्रम होईल.
22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मिरामार येथील धेंपे महाविद्यालयाच्या सहकार्याने चांद्र विज्ञान या विषयावर चर्चासत्र आणि चंद्र प्रश्नमंजुषा होणार आहे.
22 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता जुन्ता हाऊस पणजी आणि रवींद्र भवन मडगाव येथील खगोलशास्त्र वेधशाळा येथे ‘जर चंद्र नसेल तर…’ चित्रपटाचे प्रदर्शन होईल. 23 जुलै रोजी हाच कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता स्वतंत्रपथ मार्गावरील 1930 वास्को मॉल येथे होणार आहे.