चांद्रयान-3 ची शेवटची कक्षा इस्रोने वाढवली

0
7

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी चांद्रयान-3 ची पाचवी आणि शेवटची कक्षा वाढवण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. चांद्रयान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे, ज्याचे पृथ्वीपासून किमान अंतर 236 किलोमीटर आणि कमाल अंतर 127609 किलोमीटर एवढे आहे. यापूर्वी 20 जुलै रोजी 71351 किमी बाय 233 किमी अशी कक्षा करण्यात आली होती. आता हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री स्लिंग शॉटद्वारे चंद्राच्या दिशेने जाईल आणि 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल.