भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष इस्रोच्या चांद्रयान-3 या मोहिमेवर लागले आहे. चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर 23 तारखेला संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. त्यापूर्वी चांद्रयान-2 ने चांद्रयान-3 चे स्वागत केले. चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 चा संपर्क झाल्याची माहिती इस्रोने काल ट्विट करत दिली.
‘स्वागत आहे मित्रा’ अशा शब्दांत चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चांद्रयान3 च्या विक्रम लँडरचे स्वागत केले आहे. आता लँडरशी संपर्कांत राहण्याचे आणखी मार्ग तयार झाले आहेत. सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण बुधवारी सायंकाळी 5.20 वाजता सुरू होईल, असेही इस्रोने काल स्पष्ट केले.