चांद्रयानचा 9 ऑगस्टला पुढील कक्षेत प्रवेश

0
34

चांद्रयान-3 ही भारताची महत्वाकांक्षी मोहीम असून, त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. शनिवारी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चांद्रयान चंद्राभोवतीच्या 170 बाय 4313 या कक्षेत फिरत आहे. आता 9 ऑगस्टला चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्रोने काल दिली. 14 जुलैला इस्रोचे चांद्रयान-3 ने चंद्राकडे झेपावले होते. 9 ऑगस्टला चांद्रयान आणखी आतल्या कक्षेत ढकलले जाईल. 17 ऑगस्टला चांद्रयान चंद्रापासून 100 किलोमीर उंचीवर स्थिरावेल. त्यानंतर 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.