>> एआयएफएफ गोवा राज्य अंडर-१५ यूथ लीग
चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाने सेकंड लेग सामन्यात गोवा एफसी संघाला १ -१ असे बरोबरीत रोखत एआयएफएफ अंडर-१५ यूथ लीग स्पर्धेचे गोवा राज्य जेतेपद प्राप्त केले. त्याच बरोबर चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाने अखिल भारत स्तरावरील स्पर्धेसाठी आपली पात्रता मिळविली आहे.
उतोर्डा मैदानावर काल खेळविण्यात आलेला हा सामना १-१ असा गोलबरोबरीत संपला. मेवन शॉन डायसने हर्ष पत्रेच्या क्रॉसवर हेडरद्वारे गोल नांेंदवित २१व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाचे खाते खोलले. तर दुसर्या सत्रात ५०व्या मिनिटाला चाडेल नॅश फर्नांडिसने एफसी गोवा संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. एफसी गोवाने ५ विजय, दोन बरोबरी व एका पराभवासह १७ गुण मिळवित हे जेतेपद प्राप्त केले.