मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन गणेश चतुर्थीच्या काळात राज्यातील कुठल्याही भागात पाण्याची कमतरता भासू नय्े, तसेच रस्त्यावरील खड्ड्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी आवश्यक सूचना काल केली.
राज्यातील काही भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्याची पर्वरीत काल बैठक घेतली. या बैठकीत बांधकाम खात्याच्या विविध खात्याचा कामकाजाचा आढावा घेण्यत आला आहे.
गणेश चतुर्थीच्या काळात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्ड्याच्या दुरुस्तीच्या अंदाजित खर्चाचे आराखडे तयार करण्यात आले आहे. कॉंक्रीटच्या साहाय्याने खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे, अशी माहिती बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली.