चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवस कोठडी

0
18

तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचारप्रकरणी एसीबी न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. चंद्राबाबू नायडू यांना रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोर्टाने एका भ्रष्टाचार प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. नायडू यांना 14 दिवस राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री नायडू यांना शनिवारी रात्री 3.40 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी विजयवाडा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. याअगोदर त्यांची कुंचनपल्ली येथे सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली. सीआयडी पथकाने नायडू यांना शनिवारी 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या त्यांच्या बसमध्ये झोपलेले असताना नायडू यांना अटक करण्यात आली. कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात ते मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. या घोटाळ्यामुळे राज्य सरकारचे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.