भीम आर्मीचे संस्थापक तथा अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर काल गोळीबार झाला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला. या गोळीबारात आझाद जखमी झाले असून, त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली आहे. तसेच कारच्या काचाही फुटल्या आहेत. गोळीबाराच्या या घटनेनंतर भीम आर्मीने संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तातडीने अटक करावी आणि आझाद यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे.