बस्तोडा हॉली क्रॉस हायस्कूल जवळील सुरेश हळर्णकर यांच्या घराला काल सायंकाळी ४.३० च्या दरम्यान आग लागून घरातील दुरुस्तीसाठी आणून ठेवलेली १२ कपडे शिलाई मशिने, ३ पंखे, घराचे छप्पर व इतर वस्तू जळून खाक झाल्याने २ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला मिळताच दलाचे जवान विष्णू गावस, बेंजामिन डिसौझा, विठ्ठल गाड, सागर कुंकळ्येकर, परेश मांद्रेकर, प्रदीप गावकर, रुपेश गावस यांनी पाण्याचे दोन बंब नेऊन आग विझविली.
श्री. हळर्णकर यांचे घर २० कलमी अंतर्गत बांधण्यात आलेल्या जागेत आहे. त्यांच्या घरापर्यंत म्हापसा अग्निशामक दलाला पाण्याचा बंब नेण्यास कठीण झाले. तेथील रस्ता अरुंद असल्याने वाहन जाऊ शकत नव्हते. तरीही दलाच्या जवानांनी पाण्याचे बंब नेऊन आग विझविली.