घराची भिंत कोसळल्याने खोर्जुवे येथे कामगार ठार

0
6

जुने घर पाडून नूतनीकरण करण्यात येत असताना कुशे खोर्जुवे हळदोणा येथे भिंत कोसळून रमेश मावसकर (27, मूळ मध्य प्रदेश) हा कामगार ठार जाला. ही घटना काल संध्याकाळी उशिरा घडली. सदर घराचे भिंत पाडण्याचे काम 21 रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. हे पोर्तुगीजकालीन घर दुबईस्थित मूळ मालकाने दिल्लीतील एका व्यक्तीला दिले आहे. सदर व्यक्तीने हल्ली या घराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. या घराच्या मागच्या बाजूला दोन खोल्यांचे लहान घर होते ते पाडण्याचे काम चार कामगार करत होते. काम करताना घराची सदर दगडी भिंत पाडली जात होती. ही भिंत आतील बाजूने कोसळली व त्याखाली चिरडून कामगार रमेश हा ठार झाला. इतर तीन कामगारांनी त्याला बाहेर काढले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह गोमेकॉत पाठवला असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.