घराघरांतील वीज भाराची तपासणी करणार ः सुदिन

0
6

वीज खात्याच्या अभियंत्याकडून ग्राहकांच्या घरांना भेटी देऊन वीज भाराबाबत तपासणी केली जाणार आहे. राज्यात विजेचा मंजुरीपेक्षा जास्त वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती काल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे दिली.

वीज खात्याने मोप पेडणे येथे एका घरमालकाला विजेच्या चोरीप्रकरणी साडेसहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वीजमंत्री ढवळीकर म्हणाले की, वीज खात्याकडून विजेची चोरी रोखण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. घरात विजेचा अतिरिक्त वापर होत असल्यास वीज विभागाकडून विजेचा भार वाढवून घेतला पाहिजे. विजेचा भार न वाढविता अतिरिक्त विजेचा वापर होत असल्याने अनेक ठिकाणी विजेच्या लपंडावाची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांना विजेच्या वापराबाबत तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.