दत्तप्रसाद नाईक
ग्रेटर पणजी पीडीएतून ताळगावला वगळण्यात यावे, अशी मागणी काल भाजप नेते दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना केली. ताळगाववासीयांना ताळगावचा अंदाधुंद विकास झालेला नको आहे. ताळगावमधील शेत जमिनी बुजवून ह्यापूर्वीच इमारती उभ्या झालेल्या आहेत.
ताळगावात आवश्यक त्या साधनसुविधा नाहीत. पाण्याची समस्या आहे, कचरा समस्या आहे. तेथे बाजार प्रकल्प नाही. ताळगावात साधनसुविधांचा विकास केल्याशिवाय तेथे पीडीएद्वारे अंदाधुंद विकास केल्यास मोठी समस्या निर्माण होणार असल्याचे नाईक म्हणाले.