ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी फिरते पथक नियुक्त करणार: रवी

0
12

राज्य ग्राहक संरक्षण मंडळाची बैठक

राज्य सरकार ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी फिरते पथक नियुक्त करणार आहे. राज्यातील ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी उपाय योजना हाती घेतल्या जाणार आहेत. ग्राहकांच्या हितरक्षणार्थ एका उपाय योजनांसाठी एका उपसमितीची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी माहिती नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी राज्य ग्राहक संरक्षण मंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल
दिली.
राज्यात ग्राहक संरक्षण मंडळाची पहिली बैठक नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली.
राज्यात ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार आढळून येत आहेत. ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारांवर बैठकीत विचार विनिमय करण्यात आला आहे. परराज्यांतून हलक्या दर्जाच्या काजू आणल्या जात असून सदर हलक्या दर्जाच्या काजू बिया आणून फक्त गोव्यात त्याचे पॅकिंग करून त्या काजू बियांची ग्राहकांना विक्री करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच, गोव्यातील काजू फेणीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे, अशी तक्रार आल्याचे नागरी पुरवठा मंत्री नाईक यांनी सांगितले.
नागरी पुरवठा खात्याकडून चांगल्या प्रतीचा तांदूळ स्वस्त धान्य दुकानांतून उपलब्ध केला जात आहे. स्वस्त धान्य दुकानांत हलक्या दर्जाचा तांदूळ आढळून आल्यास बदलून दिला जात आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.
या बैठकीत येत्या 8 सप्टेंबर रोजी ग्राहक साक्षरता दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असे समितीचे सदस्य रोलंट मार्टीन यांनी सांगितले.

परराज्यांतून हलक्या दर्जाचे काजू गोव्यात

परराज्यांतून हलक्या दर्जाच्या काजू आणल्या जात असून सदर हलक्या दर्जाच्या काजू बिया आणून फक्त गोव्यात त्याचे पॅकिंग करून त्या काजू बियांची ग्राहकांना विक्री करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच, गोव्यातील काजू फेणीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे, अशी तक्रार आल्याचे नागरी पुरवठा मंत्री नाईक यांनी सांगितले.