ग्रामपंचायतींतील कर्मचारी भरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

0
7

ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारी भरतीसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ग्रामपंचायतीमधील कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेत एकसमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. पंचायतीमध्ये कर्मचारी नियुक्त करताना पारदर्शक प्रक्रियेचा अभाव असल्याचे आढळून येत होता. यापुढे ग्रामपंचायतींना कोणतीही रिक्त जागा भरण्यासाठी पंचायत संचालकांकडून ना हरकत दाखला (एनओसी) घ्यावा लागणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ग्रामपंचायतींमधील सर्व श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आयोजित करणे अनिवार्य आहे.