सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी आरोपी गौतम नवलखांना मोठा दिलासा देताना नवलखांना एका महिन्यासाठी तळोजा तुरुंगातून काढून नवी मुंबई स्थित त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने काही अटीही ठेवल्या आहेत. त्यात नवलखा यांना कोणत्याही प्रकारचे टेलीकम्युनिकेशन म्हणजे लॅपटॉप, मोबाइल, संगणक, आदी उपकरणांचा वापर करता येणार नाही. तसेच त्यांना कोणत्याही बेकायदा कृत्यातही सहभागी होता येणार नाही. माध्यमांशी संवाद साधता येणार नाही. तसेच या प्रकरणाशी संबंधित साक्षीदार किंवा कोणत्याही व्यक्तीशीही चर्चा करता येणार नाही. मात्र न्यायालयाने नवलखा यांच्या पार्टनर सहबा हुसैन यांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली आहे.