>> आदित्यचे दमदार शतक
>> मंथनची उपयुक्त खेळी
सलामीवीर आदित्य सूर्यवंशीचे दमदार शतक (२६ चौकार व ३ षट्कारांनिशी ३४२ चेंंडूत १८०) आणि त्याने मंथन खुटकर समवेत (१० चौकारांनिशी २४८ चेंडूत ८१) पहिल्या विकेटसाठी केलेल्या २०९ धावांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर गोव्याने केरळविरुद्ध पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या अंडर-१९ कूच बिहार क्रिकेट स्पर्धेत तिसर्या दिवशी सर्व गड्यांच्या मोबदल्यात ३५६ अशी धावसंख्याउभारली.
दुसर्या दिवसाच्या बिनबाद १३३ धावांवरून पुढे खेळताना गोव्याचा पहिला डाव ३५६ धावांवर संपुष्टात आला.
प्रत्युत्तरात खेळताना काल तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केरळने एकही गडी न गमावता आल्या दुसर्या डावात ३३ धावा बनविल्या होत्या. अजून ते ६३ धावांनी पिछाडीवर आहेत.
संक्षिप्त धावफलक
केरळ, पहिला डाव २६०, गोवा, पहिला डाव (बिनबाद १३३ धावांवरून पुढे), १३२.१ षट्कांत सर्वबाद ३५६, (आदित्य सूर्यवंशी १८०, मंथन खुटकर ८१, हेरंब परब ११ धावा. अक्षय मनोहर ४-५७, विष्णुकुमार ३-९२, आदित्य कृष्णन आणि के. अभिजित प्रत्येकी १ बळी), केरळ, दुसरा डाव, १४ षट्कांत बिनबाद ३३, (सी. ए. अमल नाबाद १०, टी. निखिल नाबाद १६ धावा).